सदगुरुंनी ह्या पुस्तकाच्या सुरुवातीला ‘परमेश्वर म्हणजे काय?’ याचं विवरण केलं आहे. नंतर मानवी शरीरात त्यांना देव कसा दिसतो? हे त्यांनी समजावून सांगितलं आहे. मानवी शरीरातील नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था-त्याबद्दल सांगत असताना त्यांनी, मानवी शरीराची तुलना दिव्य कॉम्प्युटर, टेपरेकॉर्डर, पंचमुखी महादेव, तीर्थक्षेत्र, दिव्य बँक, एक परीस अशा उत्तमोत्तम गोष्टींशी केलेली आहे आणि मानवी शरीर या सर्वांपेक्षा कसं श्रेष्ठ आहे? हे दाखविलं आहे. हे सर्व सांगत असताना, सदगुरुंनी ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा जीवनविद्येचा दिव्य गुरुमंत्र वारंवार दिलेला आहे.
Reviews
There are no reviews yet.