जीवन जगणं हीच मुळात एक कला आहे. त्याचा मुख्य पैलू म्हणजे मनात सतत चांगले विचार आणि सतत चांगल्या गोष्टींचा चिंतन असू द्यावा हे सर्वाना वाटत. पण ते बोलण्या इतकं सोप्पं नाही आहे. म्हणूनच मग आपलं मन निर्मळ आणि प्रसन्न ठेवण्यासाठी हजारो प्रयत्न करावे लागतात. ते करूनही मन शांत, सुंदर, ताजं आणि प्रसन्न राहिलंच ह्याची खात्री नाही. अश्या भरकटलेल्या परिस्थितीत ” तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असा इतका साधा सोपा, सरळ आणि सुटसुटीत सुविचार ऐकून एका प्रख्यात eye surgeon डॉ. दिलीप पटवर्धन ह्यांनी अंगिकारला आणि आज ते एक शांत, सुखी, समाधानाचे जीवन जगत आहेत. त्यांचा हा सुखाचा प्रवास सांगणारा “दृष्टिक्षेप” हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे जेणेकरून त्यांना सुद्धा जीवनविद्येचे तत्वज्ञान आत्मसात करून कसा जीवन सुखी करायचं ह्या मार्गदर्शन होईल.