book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
पाप – पुण्य समज गैरसमज
₹30.00
‘पाप-पुण्य’ या संकल्पनेने जगात इतिहासकालापासून ते आजतागायत धुमाकूळ घातलेला दिसून येतो. याचे प्रमुख कारण एकच व ते म्हणजे पाप-पुण्य या संकल्पनेसंबंधी बहुतेक लोकांत प्रचंड अज्ञान आहे हे होय. देवा-धर्माच्या नांवाखाली काहीतरी सांगितले , जाते व त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला जातो.सांगणारा किती ज्ञानी आहे, त्याचा हेतू शुध्द आहे की अशुध्द आहे, स्वार्थ बुध्दीने सांगतो आहे की लोकांच्या कल्याणासाठी सांगतो आहे, याचा विचार लोक करीत नाहीत.पाप-पुण्याबद्दलचे अज्ञान हेच सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ असल्यामुळे ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत मानवजात सुखी होणे अशक्य आहे. थोडक्यात ‘पाप-पुण्य’ या संकल्पनेबददल लोकांत जे समज-गैरसमज आहेत ते दूर व्हावेत व अखिल मानवजात खऱ्या अर्थाने सुखी व्हावी, या एकाच उद्देशाने प्रस्तुत पुस्तक प्रकाशित केले गेले आहे.
In stock
Reviews
There are no reviews yet.